सिद्धू मुसेवाला हत्या : सौरव महाकाळला केली अटक

0

पुणे : पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांची हत्या प्रकरणात सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदनाच्या दरम्यान त्यांच्या १९ गोळ्या मकरण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पंजाब पोलिसांना आठ शार्प शुटरची ओळख पटविण्यात यश आले होते. त्यातील दोन जण हे पुण्यातील होते. या पुण्यातील शर्प शुटरपैकी सौरव महाकाळ याला बुधवारी ग्रामीण पोलीसांनी अटक केली.

गायक मुसेवाला यांनी यंदाच्या वर्षी झालेल्या पंजाब विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. सुरक्षा काढून घेताच दुसर्या दिवशी मुसेवाला यांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला खून प्रकरणातील संतोष जाधव हा फरारी आरोपी होता.त्याच्या अटकेकरीता पोलीसांनी अटक वाॅरंट काढले होते. संतोष जाधव याने ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याचा पिस्तूलमधून गोळी झाडून खून केला होता.त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संतोषचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी एक पथक नेमले होते. त्याचवेळी संबंधी खबरीकडून पोलीसांना संतोष रहात असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली. संतोष जाधव याला सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याने त्याला आसरा दिल्याची माहीती मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीसांनी पुणे –  नगर रस्त्यावरील संगमनेरजवळ सौरभ कांबळे याला अटक केली.त्याला बुधवारी शिवाजीनगरच्या मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.