पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना थांबवले म्हणून चौघांनी मिळून सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना मारहाण केली. ही घटना हडपसरमधील महमंदवाडीतील सैय्यदनगर रेल्वेगेटजवळ घडली.
मोसिन बागवान (24), फैजल वहाब अन्सारी (25), शकील अद्दल अन्सारी (24), शहाबाद दिलशाद अलवी (24 सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड इतर कर्मचाऱ्यांसह सय्यदनगर रेल्वे परिसरात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या मोसिमनला त्यांनी अडविले. त्याचा राग आल्यामुळे त्याने राठोड यांना अपशब्द वापरुन आरडा-ओरड केली. त्यानंतर त्यांना चौघांनी मिळून राठोड यांना हाताने मारहाण केली.
मध्यस्थी करणाऱ्या मंगेश रोकडे आणि सयाजी सूर्यवंशी यांनाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.