आर्यन खान प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि एनसीबी वर हल्ला

0

मुंबई  : सध्या गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शिवसेनेनं पहिल्यांदाच आपली भूमिकामांडलीय. राज्याला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असून या प्रकरणाततो तपास यंत्रणांवरच उलटल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. अदानी यांच्या मालकीच्या बंदरावरसापडलेल्या अमली पदार्थांपासून ते भाजपाने या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेपर्यंत अनेक विषयांना हातघालत शिवसेनेने हल्लाबोल केलाय.

एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान

भारतीय जनता पक्षाचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. हा पक्षसुद्धा इतर राजकीयपक्षांप्रमाणे हाडामांसाचाच बनलेला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत. हे त्यांच्या प्रमुख लोकांनीसमजून घेतले पाहिजे. त्यामुळे सत्तेची तागडी वरखाली होतच असते, हे त्यांनी विसरू नये. केंद्रीयतपास यंत्रणांचा गैरवापर करून या पक्षाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे त्यातले एक एकप्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. त्यातले नवे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्जपार्टीतले उपद्व्याप. या क्रुझवर काही तरुण पोरांनी अमली पदार्थांचे सेवन केले किंवा बाळगले. सत्यकाय ते त्या धाडबाज घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचामुलगाही सापडला. खानचा मुलगा आर्यन याच्यामुळे या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे त्याप्रसिद्धीमुळे एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान झाले,” अशी टीकासामनाच्याअग्रलेखामधून करण्यात आलीय.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्या संपूर्ण प्रकरणास अमली पदार्थ व्यवहाराचारंग चढवणारे त्यात रिया चक्रवर्तीस तुरुंगात पाठविणारे हेच अधिकारी होते. रियाकडे कोणतेहीअमली पदार्थ मिळाले नव्हते. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करीत होता हे खरे. हे पदार्थ देणाऱ्याघेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते. या चार हजारांची किंमत म्हणून रियालामहिनाभर तुरुंगात राहावे लागले. चार हजार रुपयांच्या अमली पदार्थाची चौकशी करणे हेएनसीबीचेकाम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अमली पदार्थविरोधी पथक आहे मुंबईचे पोलीसअधूनमधून कोटय़वधी रुपयांचामालपकडत असतात नष्टही करतात, पण ते फालतू प्रसिद्धीसाठीउद्योग करीत नाहीत, जे रिया चक्रवर्ती आणि आर्यन खान प्रकरणात सध्या सुरू आहे,” असं या लेखातम्हटलं आहे.

३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले

कॉर्डेलिया क्रुझवर एकदोन ग्रॅम अमली पदार्थ सापडले त्याचा मोठा उत्सव एनसीबीच्या समीरवानखेडे नामक अधिकाऱ्याने केला. त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३५०० किलोचे हेरॉईनसापडले. त्याची किंमत २५ हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळे प्रसिद्धी कारवाईच्या बाबतीत ३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरसभारी पडले. हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे,” असा थेट उल्लेख करत एनसीबीच्या भूमिकेबद्दल शंकाउपस्थित करण्यात आलीय.

टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे

मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईनचे प्रकरण कधी आले संपले ते कळलेच नाही, पण एक ग्रॅम चरसप्रकरण सुरूच आहे आर्यन खानसह काही मुले तुरुंगात आहेत. कायदेपंडित सांगतात, संपूर्ण प्रकरण मूळ पुरावे पाहता हे प्रकरण जामीन मिळावा असेच आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलांना योग्यमार्गावर आणा. त्यांना योग्य ती शिक्षा करा. पुनः पुन्हा त्याच चिखलात ढकलू नका, असे आपलाकायदा सांगतो, पण तसे घडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले समीर वानखेडेयांच्या आधीच्या कारवाया धाडसी होत्या हे सगळे ठीक, पण शेवटी कायद्याची चौकट पाळावीचलागेल. त्यात गफलत झाली की कारवाई वादग्रस्त ठरते. संशयाच्या भोवऱ्यात सापडते. तेव्हा आपल्याकारवाया वादग्रस्त का ठरत आहेत, याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा. पुन्हा अशा कारवाईवर टीकाकरण्याचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून

आता या आर्यन प्रकरणातला धक्कादायक खुलासा झाला आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाईटाळण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी मध्यस्थांमार्फत झाली. त्यातली मोठी म्हणजे आठ कोटीरुपये इतकी रक्कम अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होती. त्यातली काही रक्कम इकडे तिकडेकशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले. याप्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाला की त्यासबेपत्ता केले, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच याप्रकरणी ओरबाडून निघाला आहे. प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून केंद्रीय तपासयंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

तर तुम्ही काय करणार?

पैशासाठी राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचाअसा वापर धिक्कारार्ह आहे. राज्यांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर हे आक्रमण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, एनसीबीचे अधिकारीराज्यात येऊन खोटी प्रकरणे करतात, लाचखोरी करतात त्यांना जाब विचारणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात. हा नादानपणा आहे. खोटी प्रकरणे करून काळा पैसा प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झालाआहे. आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हासवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?,” असा प्रश्न विचारण्यात आलाय.

इतिहास याला साक्षीदार आहे

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, पण अशावादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हेदेखील खरेच. कठोर टीकाकरायला काहीच हरकत नाही, पण ती कारवाईपुरतीच मर्यादित राहील हे पाहायला हवे. अर्थात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला तरीकुठे काही भान राहिले आहे? तो केंद्रीय तपास यंत्रणांचा बेभानपणे वापर करीतच आहे. भारतीय जनता पक्षाच्या मालकीच्या यातपास यंत्रणा नाहीत. जर भारतीय जनता पक्ष या सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तरलोकशाहीतमालकबदलत असतात, हे भाजपने त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. इतिहासयाला साक्षीदार आहे,” असं म्हटलं आहे.

मालक त्यांच्या नोकरांनी सावध राहावे

भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी साधनशुचिता, त्याग, राष्ट्रभक्ती वगैरे मानणाऱ्यांचा पक्ष होता. आज अशी अपेक्षा करता येणारनाही. त्यामुळे पक्षांतील जुने जाणतेही अस्वस्थ आहेत. खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचागंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातहीवसुलीकरणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाडय़ा आहेत. या नाडय़ांची गाठ कधीहीसैल होईल उघडे आहेत ते नागडे होतील. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक त्यांच्या नोकरांनीसावध राहावे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.