कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातून भिडे यांचं नाव वगळण्याचा प्रयत्न ?

0

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलाय. याबाबत राज्य सरकारकडून तसे प्रयत्न सुरु असल्याचेही डंबाळे यांनी आरोप केला आहे.

मार्च 2018 मध्ये भिडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी झाली नाही असाही आरोप त्यांनी केलाय.

भिडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देणाऱ्या व्यक्‍तींना पुरावा दाखल करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच, भिडे यांच्याकडेही चौकशी केली नाही असं डंबाळे यांनी म्हटलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.