रुपाली आकाश पाचंगे (२०, रा. वाडेबोल्हाई, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रुपाली यांचे माहेरचे लोक घरकुल, चिखली येथे वास्तव्यास आहेत. रुपाली या रविवारी माहेरी आल्या. सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत असल्याचे त्यांनी त्यांच्या आईला सांगितले.
दरम्यान सोमवारी सकाळी रुपाली यांनी फिनेल पिऊन राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्या हातगाडीवर पडून जखमी झाल्या. त्यांना महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेबाबत माहिती मिळताच रुपाली यांचे नातेवाईक वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होऊन गोंधळ निर्माण झाला. यात काही वाहनांचे किरकोळ नुकसानही झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.