पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देण्यात आली आहे.
लिलाव करण्यात येणारी वाहने वाघेश्वर पार्कींग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. ई-लिलावात एकूण 34 वाहने उपलब्ध आहेत. यात टूरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2022 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात 50 हजार रूपये रक्कमेचा ‘आर.टी.ओ. पुणे’ या नावाने अनामत धनाकर्ष सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी.
ई-लिलावात जीएसटी धारकांनाच सहभागी होता येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.