अक्षय आणि साराच्या फोटोला प्रेक्षकांची पसंती

0

मुंबई ः बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार एकेका चित्रपटाची शुटींग पूर्ण करण्यात व्यस्त आहे. करोना महामारीत लाॅकडाऊनमुळे अक्षयच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबलेले होते, त्यामुळे थांबलेल्या चित्रपटांचे शुटींग पूर्ण करण्यात अक्षय वेगवान हालचाली करत आहे. अक्षयने नुकतेच एका चित्रपटाचे शुटींगमधील सारा अली खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये अक्षय आणि सारा अली खान खूप आनंदात असल्याचे दिसत आहेत. दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना फोटोमध्ये दिसत आहेत. अक्षयने कॅज्युअल शर्टसोबत कोट घातलेला आहे तर, सारा अली खान हिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे आणि पिवळ्या रंगाची ओढणी घातलेली दिसत आहेत.

अक्षयने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, ”लाईट्स, कॅमेरा, एक्शन. हे शब्द ऐकून आनंद मिळतो. या शब्दांचे काही मोल नाही. आनंद एल राय यांच्या फिल्म ‘अतरंगी रे’ चित्रपटाचे शुटींग सुरू केले आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशिर्वादाची गरज आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान, आणि दाक्षिणात्य हिरो धनुष मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर जीशान आयुब हादेखील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.