नगर ः “महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे समन्वय समितीत एकत्रित निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार नाही. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर व्हावे, ही भूमिका शिवसेनेची आहे. सरकारची नाही”, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मांडले.
प्रफुल्ल पटेल हे शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, “समन्वय समितीत औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रीमंडळात होणार नाही. या समितीतत चर्चा होऊन वादावर तोडगा निघेल. शिवसेना औरंगबादला संभाजीनगर म्हणत असेल, तर ती भूमिका सरकारची नाही”, अशी स्पष्ट भूमिका पटेल यांनी सांगितली.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि मित्रपक्ष असणाऱ्या काॅंग्रेसमध्येच वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे महाआघाडीतील मित्रपक्षांची भूमिका ही औरंगाबादच्या नामांतरावरून भिन्न स्वरुपाची पाहायला मिळत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेचे प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.