मेटा-मायक्रोसॉफ्ट कंपन्याकडून अनेक कार्यालयांना टाळे

0

नवी दिल्ली : जगभरातील अनेक बड्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. यादरम्यान मेटा आणि मायक्रोसॉफ्टने या कंपन्या त्यांच्या अनेक कार्यालयांना टाळे लावत असल्याचे समोर आले आहे.

फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील त्यांची अनेक वेगवेगळी कार्यालये रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिएटल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या मोठ्या कंपन्यांनी कार्यालय रिकामे करण्यामागे तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल आणि बाजारातील मंदी हे महत्त्वाचे कारण दिले आहे.

सिएटल टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे की, फेसबुकने शुक्रवारी सिएटल शहरातील सहा मजली आर्बर ब्लॉक 333 आणि बेल्लेव्ह्यूमधील स्प्रिंग डिस्ट्रिक्टमधील 11-मजली ​​ब्लॉक 6 मधील आपली कार्यालये सबलीज करण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले.

तसेच मेनलो पार्क, कॅलिफोर्निया स्थित असलेल्या सोशल मीडिया कंपनी मेटाकडून सांगण्यात आले आहे की, ते इतर सिएटल-विभाग कार्यालय इमारतींच्या लीजचे ऑडिटींग केले जात आहे.

सिएटल टाईम्सनेच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्ट देखील बेल्लेव्ह्यू येथी सिटी सेंटर प्लाझा येथे आपल्या कार्यालयाच्या लीजचे नूतनीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही लीज पुढील वर्षी जूनमध्ये संपत आहे.

सिएटल टाईम्सने म्हटले आहे की, या कंपन्यांनी घरातून काम करणे याला मिळणारी पसंती आणि मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीमुळे हा निर्णय घेतला आहे. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने तांत्रिक क्षेत्रात नवे कर्मचारी आणताना त्यांच्या घरून काम करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेटाने 726 कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा देखील केली होती.

या दरम्यान, मेटाच्या प्रवक्त्या ट्रेसी क्लेटन यांनी सिएटल टाईम्सला सांगितले की लीजबाबतचे निर्णय प्रामुख्याने कंपनीनी रिमोट काम करण्याकडे वळल्यामुळे घेण्यात आले. पण आर्थिक वातावरण पाहता मेटा देखील आर्थिकदृष्ट्या समंजस निर्णय घेण्याचाही मेटा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी मान्य केले.

क्लेटन यांनी सांगितले की, कंपनीचे अजूनही 29 इमारतींमध्ये कार्यालये आहेत आणि सिएटल भागात सुमारे 8,000 कर्मचारी आहेत, जेकी कंपनीचे मेनलो पार्क मुख्यालयाव्यतिरिक्त दुसरे सर्वात मोठे इंजीनिअरिग केंद्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.