बाहेरून टाळा लावून आत सुरु असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा

6 लाखांचा मुद्देमाल; 36 जणांवर कारवाई

0

पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आप्पा कुंभार याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आज (शनिवार) पहाटे छापा टाकला. या कारवाई पोलिसांनी 6 लाख 08 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 36 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवार पेठेतील ओम शांती टॉवर्स येथे करण्यात आली. तळघरात बाहेरून कुलूप लावून आतमध्ये जुगार अड्डा सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास मंगळवार पेठेतील ओम शांती टॉवर्सच्य तळघरात असलेल्या जुगाराच्या क्लबमध्ये सुरू असलेल्या पत्त्यावरील व इतर जुगार, पैशावर गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पंचासमक्ष पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून जुगार मालक, जुगार खेळणारे, जुगार खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण 36 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. 

जुगार अड्डा मालक विरेश भीमाशंकर कुंभार (39 रा. 42/2, मिथिला अपार्टमेंट्स, 7 वा मजला,  दशभुजा गणपतीचे पाठीमागे, पौड फाटा, पुणे) जुगार अड्ड्यावरील कामगार सुमीत नरेश भाटीया (29 रा. खुशबू हॉटेल समोर, तोडकर गार्डन, ए विंग, 4 था मजला, रुम नं 405, बिबवेवाडी पुणे), दिपक सूभेदार परदेशी (22  रा. 55/56, सोमवार पेठ,  सदानंद नगर, प्लॉट नं 4, पुणे), सोनू अर्जुनसिंग ( 28 रा. मासोळी हॉटेलच्या बाजुला,  गाडीतळ, हडपसर, पुणे), सुरेश रूपना कुंभावत (26 रा.156, मंगळवार पेठ, ओमशांती, लोअर फेज 3, पुणे),

अशोक भगवान वाघमारे (५५ रा. जय प्रकाश नगर, दुर्गा माता मंदिराच्या मागे, येरवडा पुणे), धनाजी बाबुराव खाडे (४६ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, सर्वे नं‌. १२, क्षिरसागर हॉल शेजारी, येरवडा, पुणे), श्रवण राम कुमावत (३२ रा.११६, जनवाडी, गोखले नगर, पुणे), अरुण शिवनंदन सिह (४३ रा. सम्राट नगर, २२४, बोपोडी, पुणे), राकेश रामशिंग ठाकुर (३८ वर्षे, रा.शॉप नं २, ओम शांती बिल्डिंग, १५६, मंगळवार पेठ, पुणे)

जुगार खेळणारे खेळी
राहुल राजू कांबळे, (३२ वर्षे, रा. ३९४, मंगळवार पेठ,  पुणे), फैजान असिफ शेख (२७ रा. लोहियानगर, ५४,  एच पी गंज, पेठ पुणे), रवी अशोक देविया (३२ रा. १७२, मंगळवार पेठ,  पुणे), बाळासाहेब विजय शेंडगे, (३६ रा. २२७, मंगळवार पेठ, जुना बाजार, पुणे), फर्दीन अहेमद पटेल (२१ रा. लोहिया नगर, गंज पेठ, पुणे), महादेव अभिमान शिखरे (३० वर्षे, रा‌ बिल्डिंग नं. १, रुम नं ४११, नेहरुनगर स्टेडियम जवळ, पिंपरी  चिंचवड,  पुणे), दिपक नवनाथ कांबळे (३३ रा.११२२, भवानी पेठ गाडीअड्डा, खकसार मस्जिदचे समोर, पुणे), परशुराम चर्मकानी नाडार (३१ रा.१०४३, बुधवार पेठ, ताज बिल्डिंग, ४था मजला,  पुणे), अजिम अब्दुल रहिमान शेख (३३ रा. ५४, ए.पी. लोहियानगर, गंजपेठ, पुणे), निलेश लक्ष्मण सात (४२ रा. ४१९, रास्तापेठ पुणे),

राजेश ज्ञानेश्वर निघोट (४३ रा.शिवणे, एन डी ए रोड, पोकळे नगर, पुणे), गणेश राजू खानविलकर (२७ रा.पहीली गल्ली, ५४, सिपी लोहिया नगर, पुणे), शिवराज मल्लेश जाधव (२५ रा.लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे), माणिक दत्तात्रय टपळे (६८ रा.खंडोबा मंदीर, गल्ली नं ६, सुखसागर नगर, कोंढवा, पुणे), संजय धोंडिबा गोळे (५४ रा. ३३३, मंगळवार पेठ, पुणे), अनिल हणमंत वीटकर (३७ रा.लाल चाळ झोपडपट्टी, पुणे), आकाश शंकर माने (२९ रा.जनवाडी झोपडपट्टी,  गोखले नगर, पुणे), निखिल राजू कांबळे (२८ रा.३९४, नवी मंगळवार पेठ, पुणे),  निलेश सुरेश सोनवणे (४० रा.विकासशील सोसायटी, केशव नगर, पुणे), विल्यम जॉन जोसेफ, (३३ रा.१८०, जुना बाजार,  खडकी, पुणे)

सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
भिमाशंकर ऊर्फ आप्पा इरप्पा कुंभार (जुगार अड्डा मालक) (68 वर्षे, रा. नवीन नानापेठ, 418, निवडुंगा मारुती मंदीराचे शेजारी, पुणे), स्थळांवरुन पळून गेलेले 5 अनोळखी आरोपी.

या कारवाईत आरोपींकडून व घटनास्थळावरुन एकुण  6 लाख 8 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोख 1 लाख 11 हजार 100 रुपये, तसेच 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचे 29 मोबाईल व 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्य 6 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय जुगाराचे अन्य साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळघरात चालणाऱ्या या आलिशान जुगाराच्या क्लबमध्ये सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, अन त्या गणपतीच्या समोर असलेल्या लोखंडी दानपेटीचा वापर, जुगाराचे पत्त्यांचे कॅट ठेवण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून  सामाजिक सुरक्षा विभागाची या क्लबच्या हालचालींवर नजर होती व रेकी सुरू होती. पण आसपासच्या परिसरात तैनात केलेले शुटर्स (पोलीसांवर पाळत ठेवणारे) अन सीसीटीव्हीत टिपण्यात येणाऱ्या हालचालींमुळे चाणाक्ष आप्पा कुंभार लागलीच सतर्क व्हायचा अन क्लबच्या आत बसलेल्या स्टाफला मोबाईल वर संदेश देऊन अलर्ट करायचा. त्यानंतर क्लबमधील आतले लाईट बंद होऊन, जुगारी लोकांना, नागझरी मार्गे बाहेर काढले जायचे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक , पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार शिंदे, मोहीते, कांबळे, यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईसाठी परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवित आपली कामगिरी चोख बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.