बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

0

पुणे : बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजु होते.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.