मुंबई : “आज मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत”, असं अभिनेत्री , शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरयांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केलं.
उद्धव ठाकरे हे वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारे व्यक्ती”सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या माणसाचा कृतीवर विश्वास असतो त्याची कृती आणि महाराष्ट्रासाठीची प्रगती बोलते. त्यामुळे त्यांनी कमीत कमी बोललं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.