पिंपरी : अभूतपूर्व बंडाच्या नंतर शिवसेना दोन गटात विभागली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट झाले आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे आकुर्डीत शिवसेना भवन आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेनेला ही (शिंदे गट) शहरात पक्ष कार्यालय साठी जागा हवीय. त्यादृष्टीने जागेचा शोध सुरु झाले असून जागा उपलब्ध व्हावी. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पुणे कार्यालयात रितसर अर्ज करण्यात आला आहे.
या अर्जाद्वारे चिंचवड़ मध्ये पिंपरी पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस दलाच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार एमआईडीसी ने पिंपरी चिंचवड़ पोलिसांकडे अभिप्राय ही मागविला आहे. शिंदे गट सत्तेत असल्याने ही मागणी पूर्ण होण्यास काही अड़चन होणार नाही, असे ही सांगितले जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड़ पोलिसांना स्वतः जागेची कमतरता असल्याने त्यांची जागा एखाद्या पक्ष संघटनेला देण्याचा घाट घालण्यात आले आहे, त्यावर आश्चर्य व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले. बंडाचे रुपांतर दोन पक्षात झाले. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरातही उमटले. पुढील राजकीय सोयी साठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारीही गेले. तर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सुलभा उबाळे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतच थांबण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांच्या शिवसेनेचे आकुर्डीत शिवसेना भवन आहे. त्यामुळे त्यांचे त्या पक्ष कार्यालयातून काम सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आणि ढाल-तलवार चिन्ह मिळाले. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरात आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे पक्षाला कार्यालयाची आवश्यकता आहेत. पक्ष कार्यालयासाठी जागा शोधण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले, ”बाळासाहेबांच्या शिवसेनेने (शिंदे गटाने) चिंचवड येथील जुना जकात नाक्या जवळील खासदार बारणे यांच्या खासगी प्रकल्पाच्या जागेत एक ते दीड हजार चौरस फुटाचे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक ते दोन दिवसात तेथून काम सुरु होईल. कार्यालयास कायमस्वरुपी जागा मिळावी म्हणून एमआयडीसीच्या पुणे कार्यालयात अर्जही केला आहे. नवीन पक्ष असल्याने कार्यालयासाठी जागेची गरज आहे. जागा उपलब्ध असल्यास आम्ही सूचवितो, असे एमआयडीसीच्यातवीने सांगण्यात आले आहे. आम्ही रितसर एमआयडीसीकडे अर्ज केला आहे. त्यांना जागा सूचविण्याची विनंती केली आहे. जागा सूचविल्यास रितसर किंमत भरु आणि लोकवर्गीणी किंवा लोकसहभागातून कार्यालय उभे करु” असेही त्यांनी सांगितले.