मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं.
त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यात आता शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.
याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसाना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.