Whatsapp आणि facebook वर बंदी घालावी ः सीएआयटी

0

नवी दिल्ली ः whatsapp ला नवीन प्रायव्हसी पाॅलिसी लागू करण्यापासून रोखा किंवा whatsapp वर आणि त्याची मालकी असलेल्या facebook वर बंदी घालावी, अशी मागणी दी काॅन्फिडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेज सीएआयटीने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहून केलेली आहे.

सीएआयटीने पत्रात असं म्हटलेलं आहे की, “या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर युजरचा सर्व वैयक्तिक डेटा, पेमेंट ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन्स आणि अन्य महत्त्वाची माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागेल आणि त्या माहितीचा कंपनी भविष्यात कोणत्याही कारणासाठी वापर करू शकते. भारतात २० कोटींपेक्षा जास्त Whatsapp युजर्स आहेत. यातल्या प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या नव्या पॉलिसीला रोखावे किंवा दोन्ही कंपन्यांवर थेट बंदी घाला.”

whatsapp च्या या नव्या पाॅलिसीवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. तयामुळेच त्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पाॅलिसीला विरोध केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर whatsapp बाॅयकाॅट करण्याची मागणी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.