पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

0

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी चौकात कामगार आणि शेतकरी बचावसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज (मंगळवार) भारत बंद पुकारण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष; तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

पुण्यातील व्यापारी संघटनांनी त्यांची आधीची भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रस्ता असेल किंवा इतर बाजारपेठा या दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. आधी व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला. मात्र, बंदमध्ये सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. परंतु बंदला समर्थन देण्यासाठी पुण्यात काढण्यात येणारा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून जाणार असल्यानं किमान दुपारपर्यंत या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.