बेंगलोर राहण्यायोग्य शहरामध्ये अव्वल तर पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर

0
मुंबई : राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर शहर अव्वल असून पुणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पुणे शहराला लागून असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा 16 व्या स्थानी नंबर आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने ईज ऑफ लिविंग इंडेक्स रैंकिंग 2020 ची यादी जाहीर केली त्यानुसार हे स्पष्ट झाले आहे.

भारतातील 111 शहरांचे विविध निकषांवर आधारित एक सर्वेक्षण करण्यात आले. शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य, आर्थिक विकासाचा स्तर, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदूषण यांसारखे निकष लावण्यात आले होते. देशातील 111 शहरातील 32 लाख 20 हजार नागरिकांनी त्यांचे मत नोंदवले आहे.

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत बेंगलोर शहराने 66.70 गुणांसह पहिला क्रमांक मिळवला. पुणे शहराला 66.27 गुण मिळाले. राहण्यायोग्य शहरांमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे (दुसरा), नवी मुंबई (सहावा), मुंबई (दहावा) ही तीन शहरे आहेत. तर या यादीत पिंपरी-चिंचवड 16 व्या स्थानी आहे.

म्युनिसिपल परफॉर्मन्समध्ये मात्र पिंपरी-चिंचवड शहराने पुणे शहराला मागे टाकले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर भोपाळ आणि चौथ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड शहर आहे. तर पुणे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्राची पिंपरी-चिंचवड (चौथा), पुणे (पाचवा), मुंबई (आठवा) ही तीन शहरे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.