बारामतीचा पोलीसच तरुणीला घेऊन जातो लॉजवर : गोपीचंद पडळकर

0

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याचा पाढाच वाचला. विशेष म्हणजे पोलिसच कसे गुन्हेगारी कृत्य करतात हे त्यांनी सभागृहात सांगितले. बारामतीचा एक पोलीस निरीक्षक एका तरुणीला घेऊन लॉजवर गेला, त्याचं चित्रीकरण केले जाते  आणि ती क्लिप व्हायरल होते. परंतु त्या अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी का घालता असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. 

दुसऱ्या एका पोलिसाबद्दल सांगताना पडळकर म्हणाले, एका कुटुंबात भांडण झाल्यानं संबंधित कुटुंबीय बारामती पोलीस ठाण्यात गेले. त्यातून एका पीएसआयची एका महिलेसोबत ओळख झाली. यातील पीएसआयने या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन तिच्या सोबत चॅटिंग केली. एमपीएससीची तयारी करण्याच्या निमित्तानं या पीएसआयने संबंधित महिलेला पुण्याला आणून ठेवलं. याविषयी तिचा नवरा विचारणा करत असताना त्याला ठार मारण्याची धमकी दिली. महाराष्ट्रात हे चाललंय तरी काय असा संतप्त सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

तर बारामतीच्या तहसीलदार कार्यालयात एक लिपिक मुलगी काम करत असताना अनोळखी व्यक्ती आला आणि तिचे चुंबन घेऊन गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. परंतु अजूनही आरोपी सापडला नाही. हे सर्व पुणे जिल्ह्याच्या एसपीना देखील माहिती आहे. परंतु यावर कुठलीच कारवाई होत नाही. असा दावाही पडळकर यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.