मुंबई ः “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात शंकाच नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर, आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू”, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
भाजपाच्या ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ”काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने ओबीसी आरक्षणाबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं कलम टाकलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. परंतु, या कलमाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही”, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार! रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मला दुसरं आश्चर्य वाटत आहे की, सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढत आहेत. तो त्यांना अधिकार नाही. अशा पद्धतीने लोकांना भरकटवण्यापेक्षा मंत्रीमंडळात ठराव करा आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव तरी मान्य करा”, असंही देवेंद्र फडणवीस यांवी म्हटलं आहे.