मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध चालू असतानाच भाजप नेते मोहित कंबोज यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री पदामुळे युतीमध्ये झालेल्या मतभेदाला संजय राऊत जबाबदार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.
अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी खोटी कहानी संजय राऊत यांनी रचली होती. कारण संजय राऊत यांना स्वत: ला मुख्यमंत्री बनायचं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याचं काम राऊतांनी केलं. हा दुरावा आणखी वाढण्यासाठी राऊत रोज सकाळी येऊन बोलते होते आणि हेच राजकारण असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
2.5 साल – 2.5 साल के मुख्यमंत्री पद की झूठी कहानी भी संजय राउट ने रची थी !
संजय राउट को खुद CM बनना था ,
2019 चुनाव के बाद महा युति तुड़वाने का काम राउट ने किया !
भाजपा और शिवसेना की दूरी बनी रहे ,
इस लिए रोज़ 9 बजे सुबह ज़हर बोलना राउट की राजनीति हैं !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 21, 2022
वाधवानला कोरोना काळात कोणी पास दिला त्यासाठी कोणत्या बंगल्यावरून फोन गेला होता. मागील एक वर्षापासून वाधवान कोणत्या बंगल्यावर आहे, त्याला कोणकोणते नेते भेटायला गेले होते, असा सवाल कंबोज यांनी राऊतांना केला आहे. त्यासोबतच तुरूंगातील कैद्यांना पंचतारांकित सुविधा कोण पुरवतं?, दवाखान्याला अय्याशीचा अड्डा कोणी बनवला, असंही कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Wadhawan को Covid में किसने पास बना के दिया राउट साहब ?
कौन से बंगले से फ़ोन गया था ?
पिछले 1 साल से Wadhawan कौन से हॉस्पिटल में है ?
कौन कौन नेता मिलने गया ?
5 star होटेल की सुविधा जेल के क़ैदी को, यह सरकार में कौन मदद कर रहा है ?
हॉस्पिटल को अय्याशी का अड्डा किसने बनवाया है ?
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 21, 2022
दरम्यान, मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र आता यामध्ये इतरही नेत्यांनी उडी घेतली आहे.