मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आणखी एक माहिती पुढं आली आहे. गाडी मालकाने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्याचबरोबरच ठाणे व मुंबई पोलीस आयुक्त यांना त्यांनी पत्र पाठवले होते.
हिरेन यांची हत्या आहे की आत्महत्या हे अजून समोर आले नाही. तसेच विक्रोळी पोलीस क्राईम ब्रांचचे सचिन वाझे, NIA, घाटकोपर पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकारी आणि एका पत्रकाराच्या नावाचा त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. तर त्या पत्रात पोलीस व पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचंही म्हटलं आहे.
पोलिसांकडून सतत होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळावे, तसेच, माझी, माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. तसेच मनसुख यांनी विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे असं म्हटलं आहे.
दरम्यान, १७ फेब्रुवारी रात्री ६ च्या सुमारास ठाण्यातुन मुंबईला येत असताना स्कॉर्पिओ कारची (MH 02 AY 2815) बिघाड झाली होती म्हणून कार ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नाहूर उड्डाणपुल येथे लावली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता कार लावलेल्या ठिकाणी मेकॅनिकसोबत गेलो असता तेथे कार नव्हती. तर अशी तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल केली.
तसेच २५ फेब्रुवारी संध्याकाळी ११ च्या दरम्यान एटीएसचे पोलीस माझ्या घरी आले. नंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस घरी आले. तुमची कार मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितले. यामुळे मला धक्का बसला. त्या पोलिसांनी चौकशी करून गेले. नंतर २६ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि मला घेऊन गेले. सकाळी ६ नंतर त्यांनी मला घरी सोडलं. असं त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे.