पुणे : सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने छापा टाकून अटक केली. परेश मोहन भूत, प्रफुल्ल नरेंद्र कलावटे, अक्षय पांडुरंग ठोंबरे, महेश राजेंद्र क्षिरसागर यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी IPC 420, 465, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार कायदा आणि भारतीय टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
रविवारी (दि.24) मुंबई विरुद्ध लखनऊ या दोन संघामध्ये आयपीएलचा क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर वडकी येथे सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून परेश मोहन भूत (वय-37 रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ, पुणे), प्रफुल्ल नरेंद्र कलावटे (वय-37 रा. गुरुवार पेठ) यांना सट्टा घेताना आणि अक्षय पांडुरंग ठोंबरे (वय-26 रा. शिवराधानगर, वडकीनाला, पुणे), महेश राजेंद्र क्षिरसागर (वय-23 रा. वडकीनाला, पुणे) यांना सट्टा खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांनी सट्टा खेळण्याकरिता वापरलेले 10 मोबाईल हँडसेट, कॅलक्यूलेटर, मार्कर पेन, नोदवही असा एकूण 67 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी सट्टा घेण्यासाठी सिमकार्ड खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.