नवी दिल्ली ः प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्सालीचा ‘गंगूबाई काठीयावाडी’ हा आगामी सिनेमा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटाची चित्रीकरण अजून पूर्ण व्हायच्या अगोदरच हा सिनेमावर वाद सुरू झाला आहे. गंगूबाईच्या कुटुंबातील सदस्यांनी बाॅम्बे सिटी सिव्हिल कोर्टात हुसैन जेदी, संजय लिला भन्साली आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात केस दाखळ केली आहे.
याप्रकरणी ७ जानेवारी २०२१ पर्यंत वरील सेलिब्रिटीजना उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत. हुसैन जेदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या गंगूबाईच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा आधार घेत संजय लिला भन्साली गंगूबाई काठीयावाडी हा सिनेमा तयार करत आहेत. याचे चित्रीकरण मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये होत आहे. शुटिंगसाठी जो सेट उभा केलेला आहे त्याला सुमारे ६ करोड रुपये खर्च केलेले आहेत.
गंगूबाई काठीयावाडी सिनेमात डाॅन गंगूबाईचे जीवन दाखविले जाणार आहे. त्यातमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ६० दशकात गंगूबाई मुंबई माफियामध्ये मोठे नाव होते. असं सांगितलं जात आहे की, गंगूबाईच्या पतीने तिला ५०० रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर ती वैश्यांच्या जगात रमलेली होती, अशी कथा या सिनेमात साकारली जाणार आहे.