आदित्यच्या रिसेप्शन पार्टीत भारती-हर्ष सहभागी

0

मुंबई ः बाॅलिवूड अभिनेता आणि गायक आदित्य नारायण हा लग्नाच्या बेडीत नुकताच अडकला आहे. त्याने अभिनेत्री श्वेता अगरवालशी विवाह केला आहे. आदित्यने आपल्या रिसेप्शनमध्ये काही मोजक्याच लोकांना आमंत्रण दिलेले होते, यात दिग्गज कलाकारही सामील झालेले होते. त्यामध्ये ड्रग्ज प्रकरणात जामिनावर सुटका झालेली विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचियादेखील सहभागी झालेले होते.

ड्रग्ज प्रकरणात एमसीबीने भारती आणि हर्ष अटक केलेली होती. त्यांच्या घरात काही प्रमाणात गांजादेखील सापडलेला होता. तसेच त्यांनी गांजाचे सेवन करतात, असेही कबूल केलेले होते. मात्र, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनानंतर पहिल्यांदा ते सार्वजनिक कार्यक्रमात ही जोडी दिसली आहे.

रिसेप्शम पार्टीमध्ये भारती व हर्ष खूप एन्जाॅन करताना दिसत आहेत. दोघेही डान्स करताना प्रेक्षकांनी दिसून आले. त्यांचा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CITnNQinV6e/?utm_source=ig_web_copy_link

Leave A Reply

Your email address will not be published.