भुशी धरण ओव्हरफ्लो! लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांची गर्दी

0

लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेलेभुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणूनअनेकदा उल्लेख केलं जाणारे हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्यापर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबेवाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसातओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी शुक्रवारी रात्री धरण ओव्हर फ्लो होण्याच्या बेतात असताना धरणाच्या सांडव्यावरीलमोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली. गुरुवार आणि शुक्रवार या दोनदिवसात लोणावळा शहरात एकूण 248 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील वर्षी याच जुलै महिन्याच्या 6 तारखेलाच भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. त्यामानाने यंदा धरण लवकरच म्हणजे 30 जूनरोजी ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून फेसळत वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी मागील दोन्हीविकेंडला पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र या विकेंडला येणाऱ्यापर्यटकांना तो आनंद घेता येणार असल्याने या शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.