पुणे : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्तकेले आहे. यासोबतच हे ड्रग्ज ए.आर. रहमान यांच्या शोमध्ये घेऊन जाणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
आज पुण्यात संगीतकार ए. आर. रहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्ट देखील पडत आहे. या धर्तीवर पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधीपथकाने मध्य प्रदेशातून आलेल्या तीन आरोपीना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी गेल्या एक महिन्यापासून पुण्यात वास्तव्यासहोता.
लाईव्ह कॉन्सर्ट सारख्या ठिकाणी तरुण–तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच याआधी देखील अशा मोठया कार्यक्रमाच्याठिकाणी पोलिसांना ड्रग्ज सापडले आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.