त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग 12 जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम करत होते. आज विधानसभेत अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली.
अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील सातारा, सिंधुदुर्ग, रायगड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली. कोरोना संकटामध्ये आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सातारा, अलिबाग आणि सिंधुदुर्गमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवल्याचे अजित पवार यांनी सांगितले.