ममता बॅनर्जींना मोठा झटका ! 5 आमदारांनी केला ‘तृणमूल’ला रामराम

0
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चपासून सुरु होत आहे. त्यातच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदारांचे ‘आउटगोईंग’ वाढले आहे. त्यानंतर आता निवडणुकीपूर्वीच election तृणमूल काँग्रेसच्या 5 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला.

शीतल सरदार, जट्टू लाहिडी, सोनाली गुहा, दीपेंद्रू बिस्वास आणि रविंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या समावेश आहे. तसेच तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या उमेदवार सरला मुर्मू यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, मुकूल रॉय आणि शुभेंद्रू अधिकारी यांच्या उपस्थित प्रवेश केला.

दरम्यान, रविंद्रनाथ भट्टाचार्य हे 2001 पासून सिंगूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना तृणमूल काँग्रेसकडून तिकीट दिले गेले नाही. त्यामुळे त्यांची पक्षावर नाराजी होती. याच नाराजीतून त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.