नवी दिल्ली : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी विविध संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
पंजाबच्या संघाने दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार करत गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसह काही बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉएन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह यांना करार मुक्त केले आहे. तर, के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल यांना कायम केले आहे.
चेन्नई संघानं सुरेश रैनाला संघात कायम ठेवलं आहे. तर, हरभजन सिंहला रिलीज करण्यात आलं आहे. हरभजनसह आणखी काही खेळाडूंना आम्ही रिलीज करु शकतो. असं सीएसकेच्या अधिका-यांने एका वृत्तवाहिनीला सांगितले. एमएस धोनी 2021 च्या सत्रात सीएसके संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल 2021 च्या सत्रासाठी कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी बुधवारी सायंकाळी घोषीत केली जाणार आहे.
राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टीव्ह स्मिथला करारमुक्त केलं असून, अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्या घोषणा राजस्थानने केली आहे. आता राजस्थानच्या संघाची जबाबदारी युवा खेळाडू संजू सॅमसन याच्यावर असणार आहे. आयपीएल संघातील हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झॅम्पा, शहाबाज नदीम, जोश फिलीप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे या खेळाडूंना कायम राखलं आहे. ख्रिस मॉरिस, आरोन फिंच, मोइन अली, इसुरू उडाना, डेल स्टेन, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान, पार्थिव पटेल या खेळाडूंना करार मुक्त केले आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखले. मुंबईने रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान यांना कायम केले आहे तर, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफाने रूदरफर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख यांना करार मुक्त केले आहे.