ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात 24 जानेवारी पासून सुरु

0

मुंबई :राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबतनिर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलीअसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करणार असल्याचे वर्षा गायकवाडयांनी सांगितले.

From 24 (January) we will be reopening schools for classes 1-12th with COVID protocols; CM has agreed to our proposal: Varsha Gaikwad, Maharashtra School Education Minister pic.twitter.com/Tji4l8Y0AF

— ANI (@ANI) January 20, 2022

राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळामहाविद्यालये सोमवारपासून सुरुकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेयशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशदिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणारअसल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळासुरु होतीलपहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार असून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.