नवी दिल्ली : ऑईंल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. घरगुती १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांची तर ५ किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार १४.२ किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ५९४ रुपये होता. तर बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर ५५ रुपयांनी वाढविण्यात आला होता.
मात्र, १५ दिवसांनी पुन्हा तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात ३६.५० रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीमध्ये बिनासबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत ६४४ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६६० रुपये झाली आहे.
याआधी इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार १४.२ किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ५९४ रुपये होता. कोलकातामध्ये ६२०.५० रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईत ६१० रुपये होता. तर कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर वाढविण्यात आला आहे. चेन्नईत हा दर वाढून १४१० रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये ५५ रुपयांनी वाढून १२९६ रुपये, कोलकातामध्ये ५५ रुपयांनी वाढून 1351रुपये आणि मुंबईत देखील ५५ रुपयांनी वाढून १२४४ रुपये झाला आहे.