‘बीएचआर’ घोटाळा प्रकरणात बडा नेता रडारवर

0

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये आता एक राजकीय बड्या नेत्याचे नाव समोर येत असून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दोनच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी व्यावसायिक, उद्योजक, राजकीय कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक केली आहे.

बीएचआर पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण थंड होत नाही तोच अवसायक नियुक्तीनंतरच्या काळातही त्यापेक्षा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून पुणे डेक्कन पोलिसांत याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. आधीच्या टप्प्यात सीए, ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष, मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा मुलगा यांना अटक झाली होती. आता नंतरच्या टप्प्यात १२ जणांना गुरुवारी अटक झाली.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले, तेव्हा या पथकाकडे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने केलेले आर्थिक व्यवहार डोळ्यासमोर होते. या नेत्याला चौकशी साठी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.