पिंपरी :पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचेमाजी अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (शनिवारी) नियुक्ती करण्यात आली. तर, युवक शहराध्यक्षपदी इम्रानशेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी मिळाली.
पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारशहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्याजागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदीनियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्यावर्षीमहापालिका विरोधी पक्षनेतेपदासाठी गव्हाणे प्रबळ दावेदार होते. पण, पक्षाने गव्हाणे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदापेक्षा संपूर्णशहराची जबाबदारी दिली आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्च शिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायीसमितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे. नव्या–जुन्या सर्वांना एकत्र घेऊन त्यांनामहापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.