दुचाकीला ट्रकची धडक; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

0

पुणे : हडपसर येथे आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सासवड रस्त्याने मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बाप लेकिचा मृत्यू झाला. हडपसर सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटरसमोर आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

नीलेश साळुंखे (३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (१०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप- लेकांची नावे आहेत. ट्रक चालक दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मीनाक्षी ही साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. तिला शाळेत सोडण्यासाठी वडील निलेश साळुंखे हे दुचाकीने निघाले होते. सकाळी सातच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरसमोर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या निलेश साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. मीनाक्षी साळुंखे हिचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.