महाराष्ट्रात बर्डफ्लूचा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू 

0

परभणी ः देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचं संकट घोंगावत असताना महाराष्ट्रातही त्याची सुरूवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात मुरांबा येथे ८०० कोंबड्या मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी दिली आहे.

ज्या गावामाध्ये ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, तो पोल्ट्री फाॅर्म बचत गटाच्या माध्यमातून चालविला जातो. या पोल्ट्रीफाॅर्मध्ये सुमारे ८००० कोंबड्या असून त्यातील ८०० कोंबड्यांची बर्डफ्लूने मृत्यू झालेला आहे. घटना घडल्यानंतर कोंबड्यांचे नमुने भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामधून कोंबड्यांचा मृत्यू हा बर्डफ्लूने झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहवालातून बर्डफ्लूचा शिरकाव झाल्याचे कळताच जिल्हा प्रशासन अलर्ट झालेले आहे. मुरांबा गावातील १ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर गावातील लोकांचीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.