बिटकॉईन प्रकरण : ED घेऊ शकते दोघांना चौकशीसाठी ताब्यात

0

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या अभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्रनाथ पाटीलकडून पुणे सायबर पोलिसांनी सहा कोटी रुपयांचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. फसवणूक प्रकरणाचा  ईडीने समांतर तपास सुरु केला असून घोडे याने मनी लाँड्रिंग केली असण्याची शक्यता. त्यामुळे ईडी लवकरच दोघांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील बिटकॉईन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास ईडी करत आहे. पुण्यात 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास ईडी करत आहे. पुणे सायबर पोलिसांना तपासात मदत करत असताना घोडे आणि पाटील यांनी बिटकॉईन घेतल्याच्या आरोपावरुन त्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पाटील आणि घोडे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची ईडीने मागील आठवड्यात माहिती घेतली होती. त्यानंतर ईडीने समांतर तपास सुरु केला.

बिटकॉईन प्रकरणात पुणे साबर पोलिसांनी केलेल्या तपासात घोडे याने बिटकॉईनमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा संशय व्यक्त केला.
त्या अनुषंगाने ईडीने पुणे पोलिसांसोबत तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ईडी त्या दोघांचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये फसवणूक केली होती. जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी व निगडीमध्ये दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक केली होती. बिटकॉईनबाबत फारशी माहिती नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे व तत्कालीन आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील यांची मदत घेतली. पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.