त्यामुळे सत्ताधारी भाजप व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी झाली. नगरसेवकांनी सभागृह नेत्यांनाही जाब विचारला. तसेच या घटनेचा निषेध केला.याचे पडसाद सभेत देखील उमटले.
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, सभागृहात येण्यास मज्जाव केला जात आहे. ही अपेक्षा वादळात निवडूण अलेल्यान कडून नव्हती.
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, नगरसेवकांना सभागृहात येऊ दिले जात नाही,ही अत्यंत चुकीची बाब आहे. सभेला फक्त पदाधिकरीच का? आम्ही नगरसेवक का नको? काही लपवा छपवी करायची आहे का? रॅम्पवॉक, भाजपचा आमदारांचे वाढदिवस ऑनलाईन पद्धतीने का साजरे केले नाहीत
यावर पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सर्व गटनेत्यांची महापौरांच्या व आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली. जळगाव निवडणुका ऑनलाईन झाली. त्या चर्चेनुसार ऑनलाईन सभेची नियोजन करण्यात आले. कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नव्हता.राहिला प्रश्न वादळात निवडूण येण्याचा तर, येत्या २०२२ चा महापालिकेच्या निवडणुकीला भाजपचेच वादळ असणार आहे.