नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव नवी पेठेतील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती अयशस्वी झाल्याने त्यांचे निधन झाले आहे.