भाजपा नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूका अद्याप घोषित झाल्या नाहीत. मात्र 13 मार्च नंतर महापालिकेवर प्रशासनाची नियुक्ती केली आहे. यातच  सत्ताधारी भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. यापूर्वी तीन नगरसेवकांनी राजीनामे दिले असून आज थेरगावचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या माया बारणे यांनी आज (शुक्रवारी) भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

यापूर्वी भाजपचे नगरसेवक असलेल्या मोशीतील वसंत बोराटे, पिंपळेगुरवच्या चंदा लोखंडे, पिंपळेनिलखचे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यातील बोराटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज माया बारणे यांनी आज (शुक्रवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडून बारणे यांनी प्रभाग क्रमांक 24 थेरगावचे महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म होती. 2012 च्या निवडणुकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. तर, 2017 च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आल्या आहेत. मागील पाच वर्षात भाजपने त्यांना एकही पद दिले नाही. त्यामुळे पक्षावर नाराज होत्या. या नाराजीतून त्यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.