पुणे : भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका राहिवाशाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अर्चना मुसळे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. ‘त्या’ औंध येथील क्लोरीयन पार्क या एका बहुमजली इमारतीत राहतात. याच ठिकाणी यातील मारहाण झालेली व्यक्ती देखील राहते.
दरम्यान या व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात पत्रके वाटली असल्याच्या कारणावरून त्यांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले की, दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.