भाजपा आरक्षणावरून अस्थितरता माजविण्याच्या प्रयत्नात 

राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांची भाजपावर टिका

0

 

मुंबई ः ”देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते, तेव्हा का फडणवीस यांनी प्रश्न मार्गी लावले नाहीत”, असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपाचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी विचार आहे.

”देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री करा, धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मी हमी घेतो”, असे व्यक्तव्य छ. उदयनराजे यांनी नुकतेच केलेले होते. त्याला प्रतिउत्तर देत शशिकांत शिंदे यांनी वरील प्रश्न उपस्थित केला आहे.

शिंदे म्हणाले की, ”भाजपाच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले वकीलच आताही सर्वोच्च न्यायालयात खटला लढवत आहेत. जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळविण्याचा प्रयत्न करून भाजपा देशात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.