दिल्लीत भाजपच्या नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

नवी दिल्ली : दिल्लीत एका भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. 29) संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकींगसाठी आलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पोलीस किंवा पक्षाने आत्महत्येच नेमक कारण अद्याप सांगितलेलं नाही.

जी. एस. बावा (58) असे आत्महत्या केलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. ते भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बावा हे पश्चिम दिल्लीमधील फतेह नगर येथे वास्तव्यास होते. सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यांचा मृतदेह सुभाष नगरमधील पार्कमध्ये तळ्याच्या शेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिक नागरिकांनी फोन करून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी हा मृतदेह भाजपा नेते बावा यांचा असल्याचे समोर आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.