मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भाजपनेते किरीट सोमय्या यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमय्या यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. यावेळी कोर्टाने सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाच्या निर्णयाने सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तुर्त त्यांना आज दिलासा मिळाला आहे.
सत्र न्याायालयाच्या निर्णयाला किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हाय कोर्टाने सोमय्या यांचा जामीन काही अटी शर्थीवर मंजूर केला आहे. तर, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर 18 एप्रिलपासून सलग 4 दिवस चौकशीला हजेरी लावणे असे निर्देश हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत.