प्रक्रियायुक्त पाणी पुरवठ्याकरिता सल्लागारामार्फत शहरासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. मास्टर प्लॅनमध्ये शहराच्या भौगोलिक रचनेनुसार चार भाग करण्यात आले आहेत.
भाग क्र .१ : पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी MIDC चिंचवड
भाग क्र .२ : चिखली MIDC
भाग क्र .३ निगडी प्राधिकरण व तळेगाव MIDC भाग क्र .४ : चाकण MIDC
संपूर्ण शहरासाठी प्रतिदिन १२० दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. यावर कोणतीही चर्चा न करता घाई घाईने विषय मंजुर केल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, PPP किंवा HAM Mode याचा फुलफॉर्म महापौरांनी सांगावा. भाजप लोकशाही मार्गाने सभागृह चालवत नाही? निविदा मंजुर करण्याची घाई कसली? निविदा मंजुर करायच्या आणि टक्केवारी खायची.
नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले, या विषावर आमच्या उपसूचना घेतल्या असत्या तर काय भिघडळ असत.कोणत्याही विषयावर चर्चा किंवा सविस्तर बोलू देत नाहीत?