भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी

0

नवी दिल्ली : मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. याआधी राष्ट्रपतीपदासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही घोषणा केली. भाजपने राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी बैठक घेतली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज 29 जून रोजी दाखल करायचा आहे. विरोधी पक्षाने उमेदवार जाहीर केला असला, तरी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.