मुंबई : राज्यसभेचा निकालानंतर सध्या विधान परिषदेसाठी तयारी सुरु आहे. अशातच भाजपने एक पाऊल पुढे टाकत २०२४ च्या लोकसभेची तयारी सुरु केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४५’ आखल आहे. त्यानुसार सगळं काही प्लॅनिंग ठरल्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीच प्लॅनिंग आजच्या बैठकीत झालं.
लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत,याव्यतिरिक्त ८ मतदारसंघांवर देखील लक्ष ठेवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. याप्रसंगी बारामती, मावळ, सोलापूर,कोल्हापूर,सातारा मतदारसंघात जोर लावण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी पदाधिकार्यांना दिल्या.एकंदरीत राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी भाजपच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी आतापासून तयारी सुरु केल्यांच फडणवीसांनी सांगितले.