मुंबई : भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची चुकीची ओळख सांगत वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घातले असून कारवाईचा इशारा दिला आहे.
“भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिण्यात आल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला आहे.

हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर आता तरी रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारली आहे.