महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी सुरु
पिंपरी-चिंचवडमध्ये विस्तारक कार्यशाळा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीप्रमाणे एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपाचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपाने केला आहे.
‘यंदाचा निर्धार भाजपा 100 पार’ असा निर्धार करत रविवारी (दि. 30) भाजपाची विस्तारक कार्यशाळा उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित केली होती.
यावेळी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, विभागीय संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धर्म जागरण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख हेमंत हरहरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे, विजय फुगे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, नंदू भोगले, वैशाली खाडये, सुप्रिया चांदगुडे, संजय पटनी, संजय परळीकर, अमेय देशपांडे, देविदास पाटील, देवदत्त लांडे, मधुकर बच्चे, विशाल वाळुंजकर, राजू बाबर, राजश्री जायभाय, आशा काळे, गणेश ढाकणे, प्रदीप बेंद्रे, मुक्ता गोसावी, पूजा आल्हाट, शोभा भराडे, अमेय देशपांडे, धनंजय शाळीग्राम, पोपट हजारे, नंदू कदम, राम वाकडकर, बिभीषण चौधरी, विक्रम कलाटे, मुकेश चुडासमा, नंदू दाभाडे, कविता हिंगे, रेखा कडाली, पुष्पा सुबंध,आबा कोळेकर, सुधीर चव्हाण, कैलास सानप, नामदेव पवार, शिवदास हांडे, आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात सुरुवातीला चहापान झाला. त्यांनतर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी सर्व विस्तारकांचे स्वागत केले. प्रतिमापूजन आणि पद्य व सांघिक गीत झाले. संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले.
श्री हेमंत हरहरे यांचे मार्गदर्शन सत्र झाल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी प्रचारासाठी गोव्याला असल्यामुळे फोनद्वारे संवाद साधत मनोगत व्यक्त केले. श्री रवींद्र अनासपुरे यांचे दुसरे मार्गदर्शन सत्र झाले. या दोन सत्राच्या कार्यशाळेतून आगामी निवडणुकीची रणनीती आणि अन्य बाबींचा उहापोह करण्यात आला.
यावेळी नमो ॲप कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या समर्थकांना, सहानुभूतीदारांना आणि सामान्य मतदारांना डाउनलोड करण्यास आवाहन करणे. मंडलस्तरावरील पदाधिकाऱ्यांना तसेच विविध मोर्चा, आघाड्यांच्या पदाधिकाऱ्याची प्रत्येकी ५-५ बूथची जबाबदारी सोपवणे. सदस्यता यादी अद्ययावत, दुरूस्त करणे, संघटन मंत्र्यांकडून मागील दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील बूथ निहाय मतदानाची आकडेवारी मिळवणे, आदी बूथ स्तर मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शक्तीकेंद्र प्रमुखांना सूचना…
भाजपाकडून किमान पाच बूथसाठी शक्तीकेंद्र प्रमुखाची निवड करण्यात येत आहे. त्याच्यावर पाच बूथवरील सर्व संघटनात्मक व राजकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची जबाबदारी सोपवली आहे. बूथची बैठक घेणे, ज्या बूथमध्ये समिती गठण होण्यास अडचण असेल, अशा ठिकाणी प्रवास करून समिती गठीत किंवा पुनर्गंठीत करावी व अंतिम अहवाल पाठवणे. बूथ प्रमुख प्रशिक्षण व माहिती देवून प्रोत्साहण देणे, अशा सूचना शक्तीकेंद्र प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. दसेच, बुथ प्रमुख व बुथ समिती गठीत करताना सर्वसाधारण निकषही ठरवण्यात आले आहेत.
सशक्त बुथ… सशक्त भाजपा…
सशक्त बुथ…सशक्त भाजपा…मोहिमेंतर्गत बुथ प्रमुखांनी समिती गठीत करणे. मतदार याद्यांचा सर्व स्तरांवर अभ्यास करुन चार्ट तयार करणे. पेज प्रमुखांची नियुक्ती करणे. मतदारांचा अ, ब व क अशा तीन वर्गांत वर्गीकरण करणे. आपल्या बुथ परिसरातील प्रभावी व प्रतिष्ठीत व्यक्तींची यादी तयार करणे, आदीबाबत बुथ प्रमुखांना सूचना करण्यात आल्या आहेत.