पुणे : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
मात्र प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे.
भाजप युथ विंगचे राज्य सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी १० मेला पुणे सायबर पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी पोलीसांनी राष्ट्रवादी युथ विंगचे दोन कार्यकर्ते मोहसिन शेख आणि शिवाजीराव जवीर यांना अटक केली होती. बाजपेयी यांनी केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंशी छेडखानी करुन सोशल मिडियावर पोस्ट केले होते. आता गावडे यांनी पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत ५४ जणांविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली होती.
त्याआधी ४ मेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही राजकीय नेते यांच्याविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट आणि मॅसेजेस् फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर पसरवल्याप्रकरणी १३ जणांविरोधात पहिल्यांदा प्राथमिक तक्रार दाखल झाली होती.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव @PradipGavade यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली.
मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू.@CPMumbaiPolice प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जवाबदारी आपली असेल. pic.twitter.com/dbXcO2OJZl