वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या विकासकामांचा शुभारंभ केलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे.
वाराणसी मतदार संघात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. धक्कादायक म्हणजे दोन्ही मतदारसंघ भाजपला गमवावे लागले आहेत. या दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झालेले आहेत. एक दशकापासून या दोन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते.
निवडणूक निर्णय अधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा हे २५३३५१ मते आणि भाजपचे केदारनाथ सिंह यांना २२६८५ मते मिळाली आहेत.